राज्यातील 99 टक्के सोसायट्यांचे फायर ऑडिट नाही

ठाणे – राज्यातील सुमारे 99 टक्के सोसायट्यांचे फायर ऑडिट झालेले नाहीं अशी माहिती राज्य कोऑरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सितराम राणे यांनी आज येथे पत्रकारांना दिली. ते म्हणाले की गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांचे फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी अनेक सोसायट्यांनी त्याला महत्व दिलेले दिसत नाही.

गेल्याच आठवड्यात गुजरात मध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर आता फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला आहे. तसेच ठाण्यातील एका सोसायटीतील सेफ्टीक टॅंकची साफसफाई करताना तीन कामगारांचा तेथे गुदमरून मृत्यू झाला होता.

अशा घटना टाळण्यासाठी सोसायट्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले. या प्रकरणात गृहनिमाण सोसायट्यांच्या प्रतिनिधींमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाण्यात तीन दिवसांचे एक अभियान आयोजित करण्यात आले आहे. ते शुक्रवार पासून सुरू होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×