राफेलबाबतच्या निकालामध्ये कोणतीही चूक नाही – केंद्र सरकार

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली – राफेल व्यवहार प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 14 डिसेंबरला केलेल्या निकालासंदर्भात कोणतीही चूक नाही. त्यामुळे या निकालाच्या फेरआढाव्याची आवश्‍यकता नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल “स्पष्ट’ आणि जबरदस्त होता, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

केवळ काही प्रसार माध्यमांमधील बातम्या आणि अंतर्गत फायलींच्या नोंदी मिळवून राफेल व्यवहाराच्या फेरआढाव्याची मागणी करणारी याचिका करणाऱ्यात आली आहे. मात्र अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या या साहित्याच्या आधारे संपूर्ण राफेल व्यवहाराच्या फेरआढाव्याची मागणी केली जाऊ शकत नाही, असेही सरकारने म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि कार्यकर्ते ऍड. प्रशांत भूषण यांनी या व्यवहाराच्या आढाव्याची मागणी केली आहे. याशिवाय “आप’चे नेते संजय सिंह आणि ऍड. विनीत धांढा यांनीही या व्यवहाराच्या फेरविचाराची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलिइ आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.