मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या मागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संप असताना दिसत नाही. कारण हिंडेनबर्ग अहवालानंतर सुरु झालेलं शुक्लकाष्ट आणखी वाढले आहे. बाजार नियामक सेबीने अदानी समूहाच्या विदेशी सौद्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अदाणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सेबी आता अदानी समूहाच्या किमान तीन विदेशी कंपन्यांसोबतच्या व्यवहारांची चौकशी करणार असून अदानी समुहाने केलेल्या ‘संबंधित पक्ष व्यवहारां’मध्ये नियमांचे उल्लंघन होत नाही? याची तपासणी करेल. या व्यवहारांमध्ये ‘रिलेट पार्टी’ व्यवहाराच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा सेबीला संशय आहे. त्यानुसार उद्योग समूहाची आता या दृष्टीने चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले जात आहे.
तीन संस्थांनी गेल्या १३१ वर्षांत अब्जाधीश गौतम अदानी यांनी स्थापन केलेल्या पोर्ट-टू-पॉवर समूहाच्या असूचीबद्ध युनिट्ससह अनेक गुंतवणूक व्यवहार केले आहेत. तसेच गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांचा देखील या ऑफशोअर संस्थांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विनोद अदानी एकतर कंपनीचे फायदेशीर मालक, डायरेक्टर किंवा त्यांचा त्यांच्याशी काही संबंध असेल. हे उघड न करणे हे ‘संबंधित पक्ष व्यवहार’ नियमांचे उल्लंघन आहे का, याची तपासणी सेबी करत आहे. अलीकडेच अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड हे विनोद अदानी यांच्या कंपन्यांनी विकत घेतले असल्याचे उघड केले होते. याशिवाय विनोद अदानी हे अदानी ग्रुपच्या प्रमोटर्स ग्रुपचा एक भाग आहेत, असेही अदानी ग्रुपकडून सांगण्यात आले.