पुणे : हॉटेल, खानावळी पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कोथिंबीर वगळता इतर पालेभाज्यांना फारशी मागणी नाही. कोथिंबीर, मुळे वगळता सर्व पालेभाज्यांच्या गड्डीचे भाव घाऊक बाजारात 10 रुपयांच्या आत आले आहेत.
सध्या केवळ कोथिंबिरीला मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गड्डीला 8 ते 13 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये भावाने गड्डीची विक्री होत आहे.
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. पावसामुळे भिजलेल्या आणि दर्जाहिन मालाचे प्रमाणही त्यामध्ये आहे. रविवारी मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात कोथिंबिरीच्या 1 लाख, तर मेथीच्या 45 हजार जुडींची आवक झाली.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 800-1300, मेथी : 600-800, शेपू : 500-700, कांदापात : 600-800, चाकवत : 500-600, करडई : 500-600, पुदिना : 300-500, अंबाडी : 500-800, मुळे : 1000-1500, राजगिरा : 500-600, चुका : 500-600, चवळई : 600-800, पालक : 500-600.