पाकिस्तानात रोजची ‘रोटी’ही मिळेना; आहारातील गव्हाच्या पिठाची अभूतपूर्व टंचाई

इस्लामाबाद – पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईस आली आहे आणि सर्वसाधारण महागाईने उच्चांक गाठला आहे यातच आता पाकिस्तानी नागरिकांच्या दैनंदिन आहाराचा भाग असलेल्या गव्हाच्या पिठाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. 

नागरिकांना दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या रोटीसाठी गव्हाचे पीठ उपलब्ध होत नाही पाकिस्तानमधील पंजाब प्रांत हा गव्हाच्या उत्पादनांमध्ये अग्रेसर मानला जातो पण पंजाब प्रांत आणि पाकिस्तानमधील इतर प्रांतांमध्ये ही गव्हाची गोदामे आता रिकामी झाली असून सर्व परिस्थितीला तज्ञांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जबाबदार धरले आहे.

पाकिस्तानमधील गव्हाचे पीक घेण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने या कालावधीमध्ये गहू कोठून उपलब्ध करायचा याबाबत आता विचार केला जात आहे. पाकिस्तानमधील प्रतिएकरी गव्हाच्या उत्पादनात झालेली घट शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करताना होत असणारा मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार आणि साठवणुकीच्या क्षमतावरील मर्यादा यामुळे ही सध्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

ज्या ठीकाणी गहू उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून गहू आणून गव्हाच्या पिठाच्या मोठ्या गिरण्या चालवणे अशक्य असल्याने अनेक पीठ गिरणीमालकांनी आपल्या गिरण्या गेल्या काही दिवसांमध्ये बंद केल्या आहेत पाकिस्तानमधील या गंभीर समस्येची दखल युनायटेड नेशनच्या अन्न आणि कृषी संघटनेने आशिया विकास बँकेने आणि जागतिक बँकेनेही घेतली,

असून पाकिस्तानमधील बाजार समित्यांचा कारभार संपुष्टात आणून या समस्येवर मात करता येऊ शकेल असे या संघटनांनी सुचवले आहे शेतकऱ्यांना अनुदान देणे आणि गहू खरेदीतील भ्रष्टाचार कमी करणे या दोन विषयांवर इमरान खान सरकारने काम केले तर गव्हाची टंचाई संपुष्टात येऊ शकेल असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.