खोटी आश्‍वासने देण्यात भाजप आणि कॉंग्रेस एकसमानच – मायावती

लखनौ – कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे केवळ दिखाऊपणा आणि भ्रम आहे. त्यांचे मागचे रेकॉर्ड पहाता या जाहीरनाम्याला विश्‍वासार्हता नाही अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. लोकांना खोटी आश्‍वासने देण्यात कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकसमानच आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्‌विटर अकौंटवर त्यांनी ही टीका केली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल जो निवडणूक जाहींरनामा प्रकाशित केला आहे त्यात त्यांनी गरीब कुटुंबाना वार्षिक 72 हजार रूपयांपर्यंतची मदत करून त्यांची गरीबी कायमची दूर करण्याचे आश्‍वासन देतानाच अन्यही अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यावर मायावती यांनी वरील टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की कॉंग्रेस ही भाजपपेक्षा वेगळी नाही. त्यांनीही लोकांना खोटी आश्‍वासने देऊन या आधी फसवले आहे.

उत्तरप्रदेशात सपा-बसपा आणि आरएलडी या पक्षांमध्ये जी आघाडी झाली आहे त्याला भाजपही घाबरली असल्याचा दावा करून त्यांनी म्हटले आहे की त्यामुळेच त्यांनी आता जातीवादाला प्रोत्साहन देणारी विधाने करून लोकांना भडकावण्याचे काम चालवले आहे पण लोक आता अशा प्रचाराला चोख प्रत्युत्तर देतील असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.