पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा

नवी दिल्ली:  जगासह देशात गोंधळ उडवलेल्या पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला असल्याचे दिसत आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात पेगॅसस प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधीही उपस्थित आहेत.

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला.

दरम्यान, इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले  आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या डेटाबेसमधून उघडकीस आलेल्या माहितीत ५० हजार मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. त्यातील ३०० मोबाइल क्रमांक भारतीय आहेत. हे मोबाइल क्रमांक वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांचे असल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले  आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.