चंदा कोचर यांच्यावर सक्तीची कारवाई नाही

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावर हवाला व्यवहार प्रकरणी एकतर्फी सक्तीची कारवाई केली जाणार नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

कोचर त्यांचे पती दीपक कोचार, व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे.

त्याचबरोबर कोचर यांनी आपले पती दीपक कोचर यांच्यावरील कारवाईला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यात या याचिकावर सुनावणी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.