जगात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही देश असे आहेत जे इतर कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या जगातील बहुतांश देश प्रगत हवाई यंत्रणांनी सुसज्ज आहेत, जेथे विमान प्रवासापासून सामानापर्यंत नेण्यासाठी वापरले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे एकही विमानतळ नाही ! हे जाणून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे.
एका अहवालानुसार, जगात असे पाच देश आहेत जिथे विमानतळ नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की या देशांत एकही विमानतळ नसताना लोक या देशांत कसे जाणार आणि इथले लोक इतर देशांत कसे पोहोचणार? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.
१. व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे ज्याचे क्षेत्रफळ केवळ एकशे नऊ एकर आहे. हा देश ख्रिश्चन धर्माचा मुख्य संप्रदाय रोमन कॅथोलिक चर्चचे केंद्र आहे. याच पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांचे वास्तव्य येथे आहे. येथे विमानतळ नाही. खरतर हा देश खूप छोटा आहे त्यामुळे इथे विमानतळ बांधता येत नाही. येथील सर्वात जवळचे विमानतळ रोम येथे आहे.
२. सॅन मारिनो
हा युरोपीय देश युरोपमधील सर्वात जुना प्रजासत्ताक मानला जातो. हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे. येथे सध्या विमानतळ नाही. या देशात हेलिपोर्ट आणि एक लहान एअरफील्ड आहे. सर्वात जवळचे विमानतळ इटलीमध्ये आहे.
३. लिक्टेंस्टीन
लिक्टेंस्टीन ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड दरम्यान स्थित आहे. हा देश फक्त १६० स्क्वेअर किलोमीटरमध्ये वसलेला आहे, जिथे बहुतेक लोक जर्मन भाषा बोलतात. लिक्टेंस्टीन हा एक प्राचीन देश म्हणून जगात ओळखला जातो. अश्मयुगापासून येथे लोक राहत असल्याचे पुरावे आहेत. या देशात विमानतळही नाही. स्वित्झर्लंडमधील झुरिच विमानतळ येथून सर्वात जवळ आहे.
४. अंडोरा
हा देश युरोपमधील सहाव्या क्रमांकाचा आणि जगातील सर्वात लहान देशांमध्ये १६ व्या क्रमांकावर आहे. ४६८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशाची लोकसंख्या ८५,००० च्या जवळपास आहे. येथे कोणतेही विमानतळ नाहीत, परंतु त्यांच्याकडे तीन खाजगी हेलिपॅड आहेत. येथून सर्वात जवळचे विमानतळ स्पेनमध्ये १२ किमी अंतरावर आहे.
६पैकी या देशांमध्ये एकही विमानतळ नाही
५. मोनॅको
हा देश पश्चिम युरोपमध्ये स्थित आहे आणि जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे. फ्रान्स आणि इटली यांच्यामध्ये वसलेल्या या देशात जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा दरडोई अधिक लक्षाधीश आहेत. इथे विमानतळ नाही.