“एनआरसीमध्ये नावे न आलेल्यांवर सध्या कारवाई नाही”-सर्वोच्च न्यायालय

आसाम येथील नागरिकांची यादी हा फक्त मसुदा आहे. त्यामुळे ज्या ४०लाख लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करता आलेले नाही त्यांच्यावर सध्या कोणतीही कारवाई होणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पारदर्शीपणे यावर कार्य केले जाईल. त्याचबरोबर सरकारला त्यांनी वैधतेसाठी आणि अवैधतेसाठी त्यांनी अवलंबिलेल्या कार्यपद्धतीची माहिती कोर्टाला सांगण्यास बजावले आहे.

वैध नागरिकांची यादी आल्यानंतर संसदेबाहेर आणि संसदेत खूप गोंधळ झाला. कारण त्यात ४० लाख लोकांची नावे नव्हती.विरोधी पक्षांनी सरकारच्या मुस्लिमविरोधी नीतीवर ताशेरे ओढत सरकारला लक्ष्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकांसाठी मसुदा यादी ही ७ आॅगस्ट रोजी समोर येणार आहे. ज्यांची नावे येणार नाहीत ते त्यांचे नाव वैध यादीत येण्यासाठी ३० आॅगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करू शकतात, असे न्यायालयाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)