पाकिस्तानात इंधनाच्या किंमतीत प्रचंड वाढ

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये भाज्या आणि दुधांच्या वाढत्या किंमतीनंतर आता जनतेवर महागड्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. पुढच्या काही दिवसांत हा भार आणखीनच वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येते आहे. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

या वाढीसोबत पाकिस्तानात पेट्रोलच्या किंमती प्रती लीटर किंमत 108 रुपयांपर्यंत पोहचल्यात. बैठकीत डिझेलच्या किंमतींत 4.89 रुपये प्रती लिटर तर लाईट डिझेलमध्ये 6.40 रुपये प्रती लीटर वाढ झाली आहे. सोबतच केरोसिनच्या किंमतीत 7.46 रुपये प्रती लीटरपर्यंत प्रस्तावित वाढीला मंजुरी मिळाली आहे.

‘ऑईल एन्ड गॅस रेग्युलटरी अथॉरिटी’ने पेट्रोलच्या किंमतीत 14 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढीची मागणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी हे प्रकरण आर्थिक समन्वय समितीकडे धाडले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वृद्धी आणि मुद्रा अवमूल्यनमुळे हा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.