रुग्णालयांकडूनच एफडीएला माहिती; तुटवड्याची ओरड चुकीची
पुणे – गंभीर आणि ऑक्सिजनवरील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता असून या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याची ओरड शहरात सुरू आहे.
मात्र, आता या इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत असून शहरातील दीनानाथ मंगेशकर, रुबी हॉल क्लिनिक, नोबेल, सह्याद्री यासारख्या बड्या 47 रुग्णालयांनी त्यांच्याकडे इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याची माहितीच अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिली आहे.
तसेच पुणे विभागातील कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही काही प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.
शहरात रविवारी सुद्धा रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा साठा पुरेसा उपलब्ध झाला. शहरात सुमारे 4 हजार व्हायल्सच्या इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे.