वाल्हे (पुणे) :- पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे-मिरज लोहमार्गावर वाल्हे- नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील क्रमांक 27 किलोमीटर 79/01 रेल्वेफाटक बुधवार (दि.27) सकाळी 7 ते शुक्रवार (दि. 29) सकाळी 7 पर्यंत, दोन दिवस (48) तास वाहतुकीस बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने, प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
थोपटेवाडी हद्दीत रेल्वेचे 27 नंबरचे फाटक आहे. हे फाकट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी शुक्रवारपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव- जेजुरी या मार्गाचा वापर करावा. असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.