पुणे- पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये 22 हजार 162 मतदारांचे छायाचित्र नाहीत. त्यामुळे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी दि.31 ऑगस्ट पर्यंत छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.
पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्राविना मतदार यादीमधील मतदारांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या र्िीपश.र्सीें.ळप या संकेतस्थळ तसेच पुणे मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदार यांनी आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता अर्ज करावेत.
तसेच मतदार यादीमध्ये पत्ता बदल, चुकांची दुरुस्तीसाठी बीएलओ यांच्या कडे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.