बेपत्ता 8 गिऱ्यारोहकांचा ठावठिकाणा नाही

ब्रिटनच्या अन्य 4 जणांना वाचवण्यात यश

पिथोरगढ- नंदा देवी शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या आणि 25 मे पासून बेपत्ता असलेल्या 8 गिऱ्यारोहकांचा अद्यापही काहीही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. या 8 जणांमध्ये 7 विदेशी गिऱ्यारोहक आहेत. त्यांच्या सुखरूप असण्याबाबत आता शंका उपस्थित व्हायला लागली आहे. याच पर्वतशिखरावर चढाईसाठी गेलेल्या ब्रिटनच्या अन्य 4 गिऱ्यारोहकांना वाचवण्यात मात्र यश आले आहे. पिथोरगढ जिल्हा दंडाधिकारी व्ही.के.जोगदांडे यांनी याबाबत माहिती दिली.

ब्रिटनचे चौघे गिऱ्यारोहक बेस कॅम्पच्या पलिकडे 21 किलोमीटर अंतरावर अडकलेले आढळून आले होते. अन्य 8 स्थानिक गिऱ्यारोहकांच्या पथकाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. शोधासाठी दोन स्वतंत्र पथके करण्यात आले असून उद्या आणखी शोधपथके या कामावर असतील, असेही जोगदांडे यांनी सांगितले.

बेपत्ता पथकाचे नेतृत्व ब्रिटनचे प्रसिद्ध गिऱ्यारोहक मार्टिन मोरान करत आहेत. मोरान यांच्या पथकाशी आपला 24 मे रोजी अखेरचा संपर्क झाला होता, असे वाचवलेल्या ब्रिटनच्या पथकातील सदस्यांनी सांगितले. मोरान यांच्या पथकामध्ये ब्रिटनचे 3, अमेरिकेचे 2 आणि ऑस्ट्रेलियाचा 1 गिऱ्यारोहक आहे. दिल्लीतील “इंडियन माउंटेनिअरींग फाउंडेशन’चे एक पदाधिकारी चेतन पांडे हे देखील या पथकाबरोबर आहेत. हे पथक 25 मे रोजी बेस कॅम्पवर पोहोचणे अपेक्षित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.