राष्ट्रवादी पक्षाचे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्यासंदर्भात विधान परिषदेमध्ये पलटवार केला आहे. बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र चालवले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी पार पडला. या मेळाव्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ‘लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही’, या टीकेवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बारामतीमध्ये फक्त कमळच फुलणार या क्तव्यांवर धनंजय मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले होते. ‘बारामती तर सोडाच पण तुम्हाला इतर जागा राखणं तरी जमेल का याचा आधी हिशोब लावा’.