नवी दिल्ली : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी देशात ६०२ रुग्णालये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ६०२ रुग्णालयात १ लाख ६ हजार ७१९ आयसोलेशन बेड आणि आयसीयू बेड तयार ठेवण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या वतीने आर. गंगाखेडकर म्हणाले की, देशामध्ये आजमितीस २,३१,९०२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले किट्स भारताकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सध्या आपल्याकडे आणखी ६ आठवडे पुरेल एव्हडा साठा उपलब्ध असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे रमन गंगाखेडकर यांनी दिली. भारताने आयात केलेली ३३ लाख आरटी-पीसीआर किट्स व ३७ लाख रॅपिड किट्स देखील लवकरच पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गरीबांना आर्थिक मदत
देशातील 32 कोटी 29 हजार 352 कोटी रुपयांचा रोख आधार दिल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या वतीने राजेश मल्होत्रा यांनी दिली. तर आतापर्यंत 5.29 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन दिले आहे. तसेच 3 ]हजार 985 मेट्रिक टन डाळी वितरणासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.