मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख मतदार

12 लाख पुरुष आणि 10 लाख महिलांचा समावेश

पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण 22 लाख 97 हजार मतदार आहेत. यामध्ये 12 लाख पुरुष आणि 10 लाख महिला आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघांचा तसेच रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार हे पनवेल मतदारसंघात आहेत. यामध्ये 5 लाख 39 हजार मतदार आहेत. त्याखालोखाल चिंचवड मतदारसंघात 5 लाख 2 हजार मतदार आहेत. तर सर्वांत कमी मतदार हे कर्जत मतदारसंघात असून याठिकाणी 2 लाख 79 हजार मतदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.