दुबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी घेण्याचा निर्णय झाला तर एकाच वर्षात दोन विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होतील.
यंदा टी-20 विश्वकरंडक स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये होणार आहे. तर 2021 साली होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळालेले आहे. आता या दोन्ही स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल झाला तरीही एकाच वर्षात सहा महिन्यांच्या अंतराने या स्पर्धा खेळवण्यात येतील.