…तर ‘त्यांनी’ पावती दाखवून देणगी परत घेऊ शकता; साक्षी महाराज यांचे खोचक आवाहन

नवी दिल्ली : देशात सध्या राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.   दरम्यान, याप्रकरणावरून आता राजकारण पहायला मिळत आहे. खासदार साक्षी महाराज यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना,   आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगीची रक्कम परत घेऊन जावी, असे आवाहन केले आहे.   ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी आम आदमी पक्षाचे संजय सिंह आणि सपाचे माजी आमदार पवन पांडे यांच्यावर टीका केली.

साक्षी महाराज म्हणाले, “ज्या पक्षाच्या प्रमुखांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता. तेथे आज रामचे भव्य मंदिर बांधले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना हे पचत नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. म्हणून, अशा व्यक्तीवर आरोप करणे पूर्णपणे निराधार आहे.

जर आपण देणग्यांबद्दल बोलत असला तर आपण हिशोब घेऊ शकता किंवा पावती दाखवून देणगी परत घेऊ शकता” असे अवाहन साक्षी महाराज यांनी खासदार संजय सिंह आणि अखिलेश यादव यांना केले आहे.

साक्षी महाराज म्हणाले की, राम मंदिराचा तीव्र विरोध करणारे हे लोकं आहेत. ते म्हणायचे की राम मंदिराच्या नावाने अयोध्येत वीट ठेवता येणार नाही. आज त्याच अयोध्येत भगवान राम यांचे भव्य आणि जगातील सर्वोत्कृष्ट मंदिर बांधले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.