“…तर येणाऱ्या सात पिढ्या तुम्हाला आर्शीर्वाद देतील”

राज्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी सत्यजीत तांबे यांची सरकारकडे मागणी

मुंबई : देशातील काही राज्यांनी दिवाळीत फटक्‍यांवर पुर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यातही दिवाळीत फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री म्हणून मागणी केली होती. अशातच आता अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्‍यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा निर्णय घेतल्यामुळे आता काही घटकांचे नुकसान होईल, पण पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे, असेही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

‘राजस्थान, नवी दिल्ली, बंगाल या सगळ्या राज्यांमध्ये फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा निर्णय तेथील राज्यसरकारनं घेतला आहे. खरं पाहिलं तर फटाक्‍यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. म्हणून माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी महाराष्ट्रातही जास्त धूर होणाऱ्या आणि जास्त आवाज करणाऱ्या फटाक्‍यांवर कायमची बंदी आणली पाहिजे.’ असे सत्यजित तांबे यांनी म्हटले. तसेच ‘मला कल्पना आहे की, यामुळे व्यापारी वर्ग सहभागी असेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर मलाही खरेदी केला असेल. पण पुढिल सात पिढ्यांचा विचार करून, आपल्याला आता थोडं नुकसान झालं तरी चालेल, पुढच्या पिढ्यांसाठी फटाक्‍यावरील बंदी आलीच पाहिजे.’ असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्‍यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी केली. दिवाळीत फटाक्‍यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. 5 नोव्हेंबर रोजी टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.