नवी दिल्ली : करोनाने जगातील २०४ देशांत आपले बस्तान बसवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला महामारी असे घोषित केले आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या आकड्यांच्या आधारावर worldometers.info ने दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसने आतापर्यंत ५३ हजार २३८ जणांचा बळी घेतला आहे. तर देशात करोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज या लॉकडाउनचा १० वा दिवस आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका अस आवाहन देखील सर्व स्थरातून करण्यात येत आहे.
यातच बॉलीवूडमधील सुनील ग्रोवरनेदेखील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. घरात रहाल तर दारूची दुकानं लवकर उघडतील असं त्याने म्हटलं आहे. या व्हिडियोमध्ये नागरिकांनी घरात रहावं यासाठी सुनीलने हटके पद्धतीने आवाहन केलं आहे. जर तुमची इच्छा असेल की दारुची दुकानं लवकरच सुरु व्हावीत. तर सध्या शांतपणे घरीच बसा. उगाच अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नका. कारण नसताना बाहेर पडलात तर आपल्यावर ओढावलेल्या संकटात भर पडेल आणि तुम्हाला हवी असलेली दारुची दुकानंही सुरु व्हायला तितकाच वेळ लागेल, असं सुनीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सुनील ग्रोवरने याबाबत त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट करत ही भूमिका मांडली होती. दरम्यान त्याच्या या पोस्टमुळे नेटकरी चांगले कंमेंट देत आहे