Gunaratna Sadavarte : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद करण्याची मागणी अॅड. गुणरत्न सदावर्तें यांनी केली आहे. सरकारकडे निधीची कमतरता असेल, तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करून तो पैसा शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी वापरावा, असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले आहे. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले, “जर मराठा समाजाच्या महामंडळाला १५० कोटी रुपये दिले जात असतील, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर घटकांच्या महामंडळांना किमान १५-१५ हजार कोटी रुपयांची तरतूद झाली पाहिजे.” (Gunaratna Sadavarte) ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि इतर समाजांच्या संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर सरकारने भर द्यावा. “गेल्या चार वर्षांपासून विहिरींचे पैसे थांबले आहेत. कांद्याला किमान दोन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रति एकर १० हजार रुपये ॲडव्हान्स मिळायला हवेत,” अशीही मागणी त्यांनी केली. तेव्हा ती योजना बंद करा पण… (Gunaratna Sadavarte) Gunaratna Sadavarte : ‘ …तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करा’ ; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मोठी मागणी लाडकी बहिण योजना बंद करण्यासंदर्भात बोलताना महिलांना केवळ रोख मदत देण्याऐवजी शिक्षण, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला पाहिजे. लाडकी बहीण योजनेखाली आपण जे पैसे देतो, नाही तरी आपण पैसे देऊन वेगवेगळ्या चौकश्या लावत आहात. तेव्हा ती योजना बंद करा पण शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, कारण ते घामाचा थेंब थेंब गाळतात, असे सदावर्ते म्हणाले. जरांगेंना टोला (Gunaratna Sadavarte) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ३० मे पासून ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसणार आहेत. सरकारकडे त्यांनी १० प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यासाठी २८ मेपर्यंत वेळ दिला आहे. नुकतीच मनोज जरांगे यांची भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या भेटीवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका करत जरांगे यांच्यावर खोचक निशाणा साधला. “प्रसाद लाड यांनी जरांगेंचा लाड केला, पण जरांगेंचा विचार मात्र विळ्यासारखा वाकडा राहिला.” हेही वाचा : Hydration: पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कमी पाणी पिणं ठरू शकतं शरीरासाठी धोकादायक