‘…तर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील’

नागपूर – मुख्यमंत्रीपदावरून सुरु झालेला शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. सामना तर तरुण भारताच्या संपादकीयमधून भाजप आणि शिवसेना एकमेकांवर युती तुटल्याचे खापर फोडत आहे. युतीतून बाहेर पडल्यानंतर एनडीएतून आम्हाला बाहेर काढणारे तुम्ही कोण, असा सवाल करत सेनेकडून भाजपला केला होता. तर हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेल्या भूमिकेमुळे अखेर तुटली, अशी भूमिका तरुण भारतमध्ये आज मांडण्यात आली आहे. तसेच सेना व भाजपा जवळ येण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

काय आहे तरुण भारतचा अग्रलेख 
भाजपाने पीडीपी, संयुक्त जनता दलाशी घरोबा केला. तो पटो, न पटो, त्यासाठी किमान निर्णयक्षमता दाखविली. काँग्रेसकडे ती धमकही नाही, हेच सद्यस्थितीतून अधोरेखित होते. मागील सत्रात तडजोडवादी भूमिका घेणाऱया सेनेचा सध्याचा पवित्रा आक्रमक आहे. केंद्रातील सत्तेवर पाणी सोडत या पक्षाने विरोधी बाकांवर बसणे पसंत केले आहे. परंतु, ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर सेनेने हे शिवधनुष्य उचलले, त्यातून अचूकपणे सत्तास्थापनेचा वेध घेतला जाणार का, याबाबत संदिग्धता आहे. उलटपक्षी पवारांच्या भूमिकेमुळे सेनेची कोंडी झाली असून, पक्षाच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. स्वाभाविकच यातून सेना व भाजपा जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपा 3 व सेनेला 2 वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव असल्याचे वक्तव्य आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले आहेच. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत झालेला गोंधळ हे दोन पक्ष अंती एकत्र येऊन सोडविणार का, यासंदर्भातही औत्सुक्य असेल. राज्याला स्थिर व सक्षम सरकारची आवश्यकता आहे. किंबहुना, कुरघोडय़ा, डावपेचात सारे पक्ष मश्गूल दिसतात. आमचाच मुख्यमंत्री होणार, हे सेना-भाजपा या दोन्ही पक्षांचे तुणतुणे अजून सुरूच आहे.

….तर मनसेसारख्या पक्षांना फायदा होईल 
आघाडीवाल्यांच्या डबल ढोलकी व वेळकाढूपणाने वातावरण आणखी बिघडते आहे. चौकडीचे हे राजकारण चीड आणणारे आहे. उद्या या चारही पक्षांबद्दल लोकमनात असंतोष निर्माण झाला, तर सगळय़ांनाच त्याचा कमी-अधिक प्रमाणात फटका बसू शकतो. न जाणो मनसेसारख्या पक्षालाही या सुपीक वातावरणाचा फायदा होईल. राज्यात आज राष्ट्रपती राजवट आहे. किंबहुना, धोरणात्मक निर्णयांकरिता सत्तास्थापनेचा पेच लवकर सुटायला हवा, ही लोकेच्छा. त्यासाठी अर्थातच राजकीय पक्षांना प्रगल्भता दाखवावी ला

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)