मुंबई – केवळ आपला मलिदा कमी होऊ नये म्हणून पेट्रोल-डिझेल जीएसटीत टाकायला विरोध करणाऱ्यांनी दरवाढीबद्दल बोलू नये. असा टोला वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील खरेदी खर्च वगळता इतर किंमतीचे दोन भाग होतात. यापैकी केंद्र सरकारच्या भागातून प्रक्रिया खर्च,वाहतूक खर्च असे अऩेक खर्च भागवले जातात, तर राज्य सरकारचा भाग हा केवळ त्यांचा नफा असतो.
केवळ आपला मलिदा कमी होऊ नये म्हणून पेट्रोल-डिझेल जीएसटीत टाकायला विरोध करणाऱ्यांनी दरवाढीबद्दल बोलू नये. #NoMaharashtraBand pic.twitter.com/PwAaTRo0tv
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 11, 2021
जर पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याचा निर्णय अंमलात आला तर 30 रूपये कमी होतील, परंतु महाविकास आघाडी सरकारचा नफा कमी होऊ नये म्हणूनच या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार विरोध करत आहेत.