‘… तर नाथाभाऊंचे पक्षात स्वागतच करू’ – थोरात

मुंबई – विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढत आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर असल्याचे सांगत खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर काँग्रेसने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले कि, एकनाथ खडसे हे माझे खूप जुने मित्र आहेत. १९९० सालापासून आम्ही विधानसभेत एकत्र आहोत. त्यांच्या रूपाने अत्यंत समर्थ विरोधी पक्ष नेता आम्ही पाहिला आहे. ज्या नेत्याला जनमाणसांचा आधार आहे. असा नेता काँग्रेसचा विचार स्वीकारून पक्षात येत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचे स्वागत करू, असे थोरातांनी  म्हंटले आहे.

दरम्यान, भाजपवर नाराज एकनाथ खडसेंनी यांनी पक्षाला थेट इशारा दिला आहे.विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, असे खडसे म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.