‘…तर मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करेल’

उन्नाव पीडितेच्या बहिणीची धमकी 

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे पाच जणांनी बलात्कार पीडित युवतीला गेल्या गुरूवारी जिवंत जाळले होते. या घटनेत 90 टक्के भाजलेल्या या युवतीचे अखेर दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालात निधन झाले. या घटनेमुळे मोठाच जनक्षोभ उसळला आहे. पीडितेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एका आठवड्यात आरोपींना शिक्षा न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याची धमकी पीडितेच्या बहिणीने दिली आहे.

पीडितेच्या बहिणीने म्हंटले कि, जर एका आठड्याच्या आत आरोपींना शिक्षा झाली नाहीतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करेल. तत्पूर्वी पीडितेच्या अंत्यसंकारावेळी जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याठिकाणी येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी सरकारी नोकरीचीही मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाच्या अधिकऱ्यांनी पीडितेच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यावर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पीडितेवर 12 डिसेंबर 2018 रोजी दोन जणांनी बलात्कार केला होता. या प्रकरणात मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रायबरेली कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीसाठी सदर मुलगी रेल्वेने तिकडे जाण्यासाठी निघाली असताना या प्रकरणातील आरोपींनी गेल्या गुरूवारी तिचे अपहरण करून तिला रॉकेल ओतून जीवंत जाळले होते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीपैकी शुभम त्रिवेदी याची गेल्याच आठवड्यात जामीनावर सुटका झाली होती. त्यानेच आपल्या अन्य चार साथीदारांसह या मुलीला जिवंत जाळले होते. या पाचही आरोपींनी आता अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.