Rupali Chakankar : पुणे जिल्ह्यातील हुंडाबळीच्या सलग घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण संपतेच तोवर उरुळी कांचनमध्ये एका उच्चशिक्षित इंजिनियर विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने पुण्यासह महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यावर महिला संतापल्याचे दिसून आले. महिलांनी थेट रुपाली चाकणकर यांना वैष्णवी हगवणे प्रकरण झालं. त्यानंतर तुम्ही कायद्यात काही बदल केले का? असा थेट सवाल केला. कायद्यात बदल केले असते तर दीप्ती वाचली असती असे म्हणत महिलांनी आयोगावर संताप व्यक्त केला. आमच्या मुली स्वस्त झाल्या आहेत का? असे देखील महिला म्हणाल्या. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे. तर सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेनंतर महिला आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Pune Crime News : मन सुन्न करणारी धक्कादायक घटना! आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; मुलीवरही प्राणघातक हल्ला रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे. आपण ठामपणे तिच्या पाठीशी आपण उभे राहायला हवे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यासाठी अनेक पथकं आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही व्यासपीठ आहेत, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम काम करतो. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरुर सांगा, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले. दीप्तीच्या आईचे गंभीर आरोप माहेरच्यांनी एकदा १० लाख रुपये रोख, गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. यानंतरही चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी अजून पैशांची मागणे सुरूच ठेवली होती. असे दीप्तीची आई हेमलता मगर यांनी तक्रारीत म्हटले आहे. २०१९ मध्ये दीप्तीचे लग्न मोठ्या थाटात घरच्यांनी करून दिले. शाही पद्धतीने झालेल्या लग्न सोहळ्यात माहेरच्या लोकांनी लग्नात ५० तोळे सोने, लग्नानंतर मुलीचा संसार टिकावा म्हणून ३५ लाख रोख रक्कमही दिली होती. दीप्तीचा गर्भपात झाल्याचा आरोप दीप्तीचा गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे, असे दीप्तीने तिची आई हेमलता यांना सांगितले होते. तेव्हा मला धक्का बसला, असे हेमलता मगर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हेही वाचा : India-EU FTA Deal : भारत-EU मध्ये मोठा करार ! पंतप्रधान मोदींनी केल्या सह्या ; घोषणा करत म्हणाले,”हा करार जगातील”