जेरुसलेम – हिजबुल्लाह बरोबरचा युद्धविराम संपुष्टात आला तर इस्रायल लेबनॉनला लक्ष्य करण्यासाठी हल्ले वाढवेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे. इस्रायलने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हिजबुल्लाहने वादग्रस्तच सीमाभागात सोमवारी दोन मोर्टार डागल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने हा इशारा दिला आहे.
दरम्यान, युध्दविरामांचा कोणताही भंग झाला तर लेबेनॉनच्या मालमत्तेचे लक्ष्य करत परिसरात मोठ्या प्रमाणात हल्ले केले जातील, असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राईल कार्ट्झ यांनी दिला आहे.
इस्रायल युद्धबंदीसाठी वचनबद्ध असून कोणत्याही उल्लंघनाला ठाम उत्तर देईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. दिनांक २७ नोव्हेंबर, २०२३ पासून दोन्ही देशातल्या संघर्षाला युद्धविराम लागू झाला आहे.
दरम्यान ज्यू स्थायिकांनी व्यापलेल्या वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी शहरांवर रात्रभर हल्ले केले, घरे जाळली आणि पॅलेस्टिनी सैन्याशी इस्रायली सैन्याशी चकमक झाली. कोणत्याही पॅलेस्टानीची जीवितहानीचे त्वरित वृत्त नाही.