मुंबई – राज्यव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. या बद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. जीवाची पर्वा न करता करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.
केंद्र सरकारकडून कोविड लसीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार करोनाद्ध्यांना सर्वात आधी लस देण्याचे ठरले आहे. नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस टोचून घेतली असती, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रामध्ये करोनाची लस मोफत दिली जाणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारकडून अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही. तसेच, लसीची किंमत किती असेल याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. केंद्राने याबद्दल भूमिका स्पष्ट केली तर राज्यात आम्ही पुढचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले आहे.
जीवाची पर्वा न करता करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मानाचा मजुरा – मुख्यमंत्री