पिंपरी – पुणे महापालिकेकडून सुरु असलेल्या विकासकामाच्या एका साइटवरून चोरट्यांनी 70 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 24) सकाळी विज्ञाननगरच्या मागे, बावधन येथे उघडकीस आली.
विशाल बाबुराव धोत्रे (वय 38, रा. कोथरूड, पुणे) यांनी सोमवारी (दि. 24) याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतर्फे बावधन येथे विज्ञाननगरच्या मागील बाजूला स्वामी विवेकानंद स्पोर्ट क्लब येथे विकासकाम सुरु आहे. या कामाच्या साइटवरून चोरट्यांनी 21 ऑगस्ट रोजी रात्री आठ ते 24 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान 64 हजार रुपयांची पॉली कार्बनेटची एक शीट आणि सहा हजार रुपयांचे आठ एक्स फ्रेम असे एकूण 70 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.