लिंबोळी खताच्या गोण्यांची चोरी

कोपरगाव  – तालुक्‍यातील शिंगणापूर येथील व्यापाऱ्याचे ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून खताच्या गोडावूनमध्ये प्रवेश करित 25 किलो वजनाच्या 50 लिंबोळी खताच्या गोण्या किरण बोथरा (रा. अंबिकानगर, कोपरगाव) याने चोरुन नेल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सदरची घटना 12 जानेवारी रोजी रात्री 7.30 वाजता घडली.

यासबंधी व्यापारी राजेंद्र गणपत रुपनर (रा. शिंगणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की 12 जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान माझे गोडावूनचे आजुबाजुला राहणारे लोकांनी मला फोन करुन संगितले की, तुमच्या गोडावूनजवळ किरण बोथरा हा त्याचे होंडा मोटर सायकलवर आला व त्याने ऑफिसचे दरवाजाचे कुलूप तोडले.
गोडावूनमध्ये प्रवेश करुन तेथील लिंबोळी खताच्या 25 किलो वजनाच्या 50 गोण्या ऍपे रिक्षामध्ये घालून घेवून गेला. या गोण्यांची किंमत सुमारे 25 हजार रुपये होती.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात किरण बोथरा याचे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.