कोंढव्यात 546 लिटर दुधाची चोरी; चोर सीसीटीव्हीत कैद

पुणे – कोंढवा परिसरात ग्राहकांसाठी आणलेले दूध एक रिक्षाचालक पळवत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या भागातील 7 दुकानांतून गेल्या सहा महिन्यांत तब्बल 546 लिटर दुधाच्या पिशव्या या चोरट्याने पळवल्याचे निदर्शनास आले आहे.

सीसीटीव्हीही फुटेजवरून त्याचा माग काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दूध वितरक किराणा मालाच्या दुकानांसमोर ठेवलेल्या क्रेटमध्ये दररोज ठरल्यानुसार दुधाच्या पिशव्या ठेवून जातात. 13 फेब्रुवारीला या क्रेटमधून 102 लिटर दुधाच्या पिशव्या गायब असल्याचे दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर 12 मार्चला एका दुकानातून 116 लिटर दुधाच्या पिशव्या चोरीस गेल्या.

पाठोपाठ दि. 1 एप्रिलला 124 लिटर व 7 एप्रिलला 48 लिटर दुधाच्या पिशव्यांची चोरी झाली. दुकानदारांनी तक्रारी केल्यावर वितरक योगेश लोणकर ( रा. कोंढवा) यांनी मागोवा घेतला असता तीन महिन्यांपूर्वीही दोन दुकानांमधून 156 लिटर दुधाच्या पिशव्यांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता एक रिक्षाचालक भल्या पहाटे दुधाच्या पिशव्यांची चोरी करत असल्याचे दिसून आले. तो या पिशव्या अन्यत्र विकत असावा, अथवा दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये तो सामील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.