पुणे – वडगाव बुद्रुक भागातील दांगट गार्डन सोसायटीत मोटारीतून शिरलेल्या चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालून सदनिकांचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी दोन सदनिका फोडून ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.
सोसायटीत चोरटे शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरटे मोटार सोसायटीच्या आवरात सोडून पसार झाले.
पोलीस आल्याची चाहूल लागल्याने चोरटे पसार झाले. सोसायटीत मध्यरात्री मोटारीतून आलेल्या चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले असून त्यांचा शोध सुरू आहे.
मध्यरात्री चोरट्यांनी सोसायटीतील दोन बंद सदनिकांचा दरवाजा तोडून ऐवज लांबविला. सोसायटीत चोरटे शिरल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. रात्रपाळीत गस्त घालणाºया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीत पोलीस पोहोचले. पोलीस आल्याची चाहुल लागल्यानंतर चोरटे सोसायटीच्या आवारात मोटार सोडून पसार झाले.
चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार चोरीची असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी घटनास्थळी भेट दिली.