पुणे,दि.8 – लोहगाव परिसरात उघड्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तीन लाख सहा हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वर्षीय व्यक्तीन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील प्राईम डायमंड रिजेन्स रो हाऊस नंबर पाच येथे चार ते पाच मे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांची पत्नी हे या ठिकाणी राहतात. चार मे रोजी रात्री तक्रारदार व त्यांची पत्नी हॉलमध्ये झोपलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने बेडरूमच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश केला.
कपाटात ठेवलेले हजार रूपये, सोने व चांदीचे दागिने असा तीन लाख सहा हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिक दारे-खिडक्या उघडे ठेऊन झोपत आहेत. त्याचा फायदा चोरटे उठवताना दिसत असून नागरिकांनी झोपताना दारे व खिडक्या लावाव्यात, असे आवाहन केले आहे.