चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ

उद्योजकाच्या वाहनातून 55 लाख लांबविले

पारनेर – मोटारगाडीची काच फोडून गाडीतील 55 लाखांच्या रकमेची बॅग चोरून नेल्याची घटना तालुक्‍यातील जामगाव शिवारात मंगळवारी रात्री घडली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र पोलिसांनी दोन जणांना चौकशी ताब्यात घेतले आहे.

पारनेर येथील उद्योजक सुरेश धुरपते हे कामानिमित्त मुंबईवरून गावी आले होते. घरी आल्यानंतर त्यांच्या चालकांनी काही गाडीतील बॅग व सामान घरात नेऊन ठेवले. एक बॅग गाडीच राहू दे असे सांगून धुरपते घरात गेले. त्यानंतर चालक निघून गेला. काही वेळाने धुरपते बाहेर आले व त्यांनी गाडीकडे पाहिले असता गाडीची एका कोपऱ्यात काच फोडली असल्याचे दिसले. त्यांनी गाडीत पाहिले असता गाडीतील बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गावातील आपल्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर चोरीला गेलेल्या बॅगेचा शोध घेण्यात आला. परंतु बॅग आढळून आली नाही.

पैसे असणारी बॅग चोरीला गेली असल्याबाबत पारनेर पोलिसांना सांगण्यात आले. परंतु इतकी मोठी रक्कम असणारी बॅग गाडीत का आणि कशासाठी ठेवली होती. याची माहिती धुरपते यांच्या मिळणे आवश्‍यक आहे. ही माहिती त्यांच्याकडून मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला नाही. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हागुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. धुरपते यांनी एवढी मोठी रक्कम का आणली होती व कोणासाठी आणली होती. हे पोलिसांना कळले नाही. दरम्यान या घटनेबाबत तालुक्‍यात दिवसभर चर्चेला उधाण आले.

Leave A Reply

Your email address will not be published.