बीड – नवसाला पावणार्या रेणुका देवी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार बीडमधील देवगावमधून समोर आला आहे. या मंदिरात चोरीची ही तिसरी वेळ आहे. असे जरी असले तरी मात्र रेणुका देवी मंदिरात सुरक्षेसाठी कोणतीही खबदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे येथील भावीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री चोरट्यांनी रेणुका देवी मंदिराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील मुद्देमाल, सोन्याचांदिच्या वस्तू आदी चोरून नेल्या आहेत.
मंदिरातील झालेल्या चोरीप्रकरणी केज पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून घेतला आहे. याआधी याच मंदिरात दोन वेळा चोरी झाली आहे. मात्र ते चोरट्यांना अद्यापही पोलिसांना पकडण्यात यश आले नाही.
देवगावमधील रेणुका देवीचे मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणाऱ्या रेणुका देवी मंदिरात हजारोंच्या संख्येने येणारे भाविक भरभरून दान करत असतात. त्यामुळे चोरीची सत्र थांबविण्यसाठी या मंदिरात सीसीटीव्ही लावण्यात येण्याची मागमी भक्तांनी केली आहे.