Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

विविधा : जयराम शिलेदार

- माधव विद्वांस

by प्रभात वृत्तसेवा
December 6, 2022 | 5:00 am
A A
विविधा : जयराम शिलेदार

मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते, नाट्यनिर्माते, गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1916 रोजी शहापूर बेळगाव येथे झाला. त्यावेळी मराठी रंगभूमी बहरात होती. लहानपणापासूनच त्यांना नाटकाचे आकर्षण होते. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे सुवर्णयुग चालू होते. संगीत रंगभूमीने संगीत रसिकांना झपाटून टाकले होते. त्यांनी वर्ष 1932 मधे रघुवीर सावकार यांच्या नाट्य मंडळीत प्रवेश केला. कागलकरबुवा व निळकंठराव चिखलीकर यांच्याकडे त्यांनी गायनातले प्राथमिक धडे घेतले. परंतु रघुवीर सावकार हे गाण्यातील त्यांचे पहिले गुरू. स्त्रीवेशात नमनाचे गाणे म्हणून “संशयकल्लोळ’ नाटकापासून त्यांनी आपल्या नाट्यजीवनाचा श्रीगणेशा केला.

त्याचवेळी बोलपटांचा बोलबाला सुरू झाला व त्यामुळे रंगभूमीवर सावंत येऊ लागले. वर्ष 1947 मधे राम जोशी यांच्या जीवनावर आधारित “लोकशाहीर राम जोशी’ हा चित्रपट व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाची पटकथा ग. दि. माडगूळकर यांची होती तर जयराम शिलेदार यांच्याबरोबर, हंसा वाडकर, शकुंतला, परशुराम, ग. दि. माडगूळकर, सुधा आपटे, सामंत, वालावलकर, जयराम देसाई, कानसे, सावळाराम यांनीही भूमिका केल्या होत्या. या चित्रपटामध्ये जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका वठविली होती. या चित्रपटातील पाचही गाणी जयराम यांनी गायली होती, तर संगीत वसंत देसाई यांचे होते. या चित्रपटास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला व जयराम शिलेदार यांचे नाव चंदेरी दुनियेतही घेतले जाऊ लागले. “जीवाचा सखा’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.

वर्ष 1949 मध्ये दसऱ्याच्या मुहुर्तावर “मराठी रंगभूमी’ या स्वतःच्या नाट्य संस्थेचा प्रारंभ केला. परंतु काही अडचणींमुळे संस्था बंद पडली. जयराम यांनी आलेल्या अडचणींचा अभ्यास करून पुन्हा 5 ऑगस्ट 1953 रोजी नव्या जोमाने “मराठी रंगभूमीची’ सुरुवात केली. भरदार देहयष्टी व रंगभूमीला हवा तसा तेजस्वी आवाज या दोन दैवी देणग्या शिलेदारांना लाभल्या होत्या. या सर्व अभिनयाच्या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची अर्थात जयमाला शिलेदार यांची मोलाची साथ मिळाली.

वर्ष 1947 मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाट्यमहोत्सवातील “धरणीधर’ या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर “शाकुंतल’ नाटकामध्येही त्या जयराम यांच्या नायिका होत्या. 10 ऑक्‍टोबर 1949 रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. 23 जानेवारी 1950 रोजी जयराम शिलेदार प्रमिला जाधव यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांनी अक्षरशः संगीत नाटकांमध्ये प्राण ओतले. चित्रपट युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग त्यांनी पुन्हा खेचून आणला.

“मराठी रंगभूमी’ ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेक कलाकारांना घडविले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 32 नाटके रंगमंचावर आणली. आपल्या कलेचा वारसा आपल्या कन्या लता व कीर्ती शिलेदार यांना सोपवून रंगभूमीवरून निवृत्त झाले. 6 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले.

Tags: editorial page articleJairam ShiledarTheater and film actorविविधा : जयराम शिलेदार

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : संविधानाचे सर्वोच्चपण
Top News

अग्रलेख : संविधानाचे सर्वोच्चपण

1 day ago
अर्थकारण : रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण?
Top News

अर्थकारण : रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण?

1 day ago
विशेष : राष्ट्रप्रेमाची मशाल जागृत करा!
Top News

विशेष : राष्ट्रप्रेमाची मशाल जागृत करा!

1 day ago
निसर्गगाणे : तेजाचे पूजन
संपादकीय

निसर्गगाणे : तेजाचे पूजन

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“न जाणो, किती जणांच्या हृदयाला यामुळे…”; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनुस्मृतीचे पठन केल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

Most Popular Today

Tags: editorial page articleJairam ShiledarTheater and film actorविविधा : जयराम शिलेदार

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!