जिल्हा परिषदेच्या योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचविणार

नगर – महीला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी मनोगत व्यक्त करताना शेटे म्हणाल्या की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली ती मी निश्‍चित पूर्ण करणार असून माझ्या निवडीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सर्वांचे योगदान आहे.

केंद्र, राज्य शासनाच्या महिला बालकल्याण योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. कुपोषण निर्मूलनाच्या योजना असतील त्या सर्व तळागाळातील लोकांना पोहोचवण्याचे काम करेल. जिल्हा परिषदेच्या विविध योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्‍चित प्रयत्नशील राहील.

पदभार स्वीकारल्यानंतर शेटे यांचा सत्कार जिल्हा पारिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण संजय कदम, उपशिक्षणाधिकारी अरून धामणे ,सुनील जाधव, चंद्रशेखर वायकर, कैलास भडके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.या सर्वांनी शेटे यांचे स्वागत केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here