घोडेगावच्या युवकांची पोलीस मित्र म्हणून नियुक्ती : पवार यांची माहिती
मंचर – करोना विषाणूच्या विरोधात लढा देण्यासाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार व ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या संकल्पनेतून घोडेगाव येथील युवकांना पोलीस मित्र म्हणून नियुक्त केले आहे. हे पोलीस मित्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
घोडेगाव (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंच क्रांतीताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या संकल्पनेतून घोडेगाव येथे सेवाभावी काम करण्यासाठी पोलीस मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार गर्दी होऊ न देणे, ज्यांना अत्यावश्यक गरज आहे अशा वस्तू घरपोच उपलब्ध करून देणे, बाजारपेठ, किराणा दुकान, भाजीपाला दुकानामध्ये अनावश्यक गर्दी होऊ न देणे, नागरिकांना घराबाहेर पडू न देणे, नागरिकांना मास्क वापरण्यास परावृत्त करणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर वाहतूक व्यवस्था करणे, आवश्यक असेल तेव्हा कोणत्याही कामासाठी उपलब्ध होणे इत्यादी कामांसाठी या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस मित्रांची नावे आणि मोबाइल क्रमांक
सुनील इंदोरे 9421001280, संतोष काळे 9552131415
सुभाष काळे 8975784848, अक्षय नंदकर 8275749868, वैभव मंडलिक 9960916535, ऋषीकेश शेटे 9011470775, किरण राऊत 8390488079, सुरज काळे 9730791624,
महेश वाघमारे 9766158131, सूर्यकांत काळे 7507131415,
कपिल काळे 9890202201, बाळा कोळपकर8805074538,
स्वप्नील घोडेकर 9922726533