तरुणास डांबून मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

चंदननगर येथील घटना : फर्निचर कारागिरांचे कृत्य

पुणे – तरुणास डांबून मारहाण केल्यानंतर संबंधित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खराडी-चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मृताच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. तर रामस्वरुप (21) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 5 मे 2019 रोजी घडली. तर, तरुणाचा मृत्यू 4 जून रोजी जोधपूर येथे रुग्णालयात झाला.

फिर्यादीने मुलगा रामस्वरुप यास पप्पु राम (रा. खराडी) याच्याकडे दोन महिन्यांपूर्वी फर्निचर कामगार म्हणून पाठवले होते. फर्निचरचे काम करत असताना पप्पूराम, त्याचा मित्र जगदीश हे संगनमताने त्यास कपडे धुणे, भांडी साफ करणे, स्वयंपाक करणे व घरातील साफ-सफाईची कामे सांगत होते. काही दिवसांनंतर रामस्वरुपने ती कामे करण्यास नकार दिला. यावर पप्पुराम व जगदीश यांनी त्याला 5 मे रोजी दुकानातील खोलीत डांबून ठेवत मारहाण केली.

यानंतर जखमी अवस्थेतच त्याला राजस्थान येथे गावी पाठवून दिले. यानंतर जयपूर येथील खासगी रुग्णालयासह जोधपूर येथे औषधोपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा दि.4 जून रोजी मृत्यू झाला. याचा तपास सहायक पोलीस आयुक्त
डॉ. शिवाजी पवार करत आहेत.

रामस्वरुप हा गावी पोहोचल्यावर वेड्यासारखा वागत असल्याने त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू होते. यानंतर त्याच्या वडिलांनी राजस्थानमध्ये गुन्हा दाखल केला. तो चंदननगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. रामस्वरुपच्या उपचाराचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत.
– डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्‍त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)