बॉलीवूड अभिनेता सोनू सूद सध्या अनेकांसाठी देवमाणूस बनला आहे. या करोना काळात आर्थिक मदतीपासून ते ऑक्सिजन, बेडपर्यंत सर्व प्रकारची मदत सोनू सूद करत आहे.
मात्र सोनूच्या या मदतीने सर्वचं हैराण झाले आहेत. एका मुलीने सोनूला ट्वीट करत चक्क “बॉयफ्रेंड’ मिळवून देण्याचे आवाहन केले होते. अन् विशेष म्हणजे काही वेळातचं तिची ही इच्छा पूर्ण देखील झाली.
ज़मीन से जुड़ा हूं दोस्त।
नीचे खींचोगे तो भी ज़मीन पे ही मिलूँगा 🇮🇳— sonu sood (@SonuSood) May 18, 2021
अभिनेता सोनू सूदने नुकताच एक ट्वीट केले होते. त्यामध्ये त्याने लिहिले की, जमीन से जुडा हुं दोस्त, नीचे खिंचोगे, तो जमीनपर ही मिलुंगा. अशा आशयाची ही पोस्ट होती.
काही वेळाने एका मुलीने कमेंट करत सोनूकडे एक विचित्र मागणी केली होती. मुलीने सोनूकडे चक्क एका बॉयफ्रेंडची मागणी केली.
यावर सोनूने कोणतीचं कमेंटही केली नव्हती. मात्र काही वेळा नंतर एका मुलाचा रिप्लाय आला. हो मॅडम, मला सोनू सरांनीच पाठवले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. की सोनूने मुलीला चक्क बॉयफ्रेंड शोधून देण्यासाठीही मदत केली. सध्या या कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.