Pune Crime | प्रेमास नकार दिल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न; प्रेयसीसह वडिलांवर कोयत्याने वार

पुणे – प्रेमास नकार दिल्याने प्रेयसीसह तीच्या वडिल व बहिणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये संबंधीत तरुणीचे वडिल गंभीर जखमी झाले असून तीघांविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हडपसर काळेपडळ येथे रहाणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, यातील एका आरोपीने त्यांच्या मुलीकडे प्रेमाची मागणी केली होती. तीने त्यास नकार देऊन परतवून लावले होते. यामुळे त्याने फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडा ओरडा करत फिर्यादीला तुला जीवे ठार मारतो अशी धमकी दिली.

याची तक्रार करण्यासाठी फिर्यादी दोन्ही मुलींना घेऊन पोलीस चौकीकडे चालले होते. ते जात असतानाच आरोपी तेथे दोघा साथीदारांना घेऊन दाखल झाला. त्याने फिर्यादीच्या डोक्‍यावर व खांद्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाथा-बुक्‍या व दगडानेही मारहाण केली.

यानंतर दोन्ही मुलींना हाताने मारहाण केली. यानंतर हातातील कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप वरपडे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.