तरुणीची छेड काढणाऱ्यास पाठलाग करुन पकडले

संगमनेर – जेवण घेतल्यानंतर दोन विद्यार्थिनी वसतिगृहाकडे जात असताना त्यांचा विनयभंग करून पळून जाणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या तरुणाचा पोलिसांनी सुमारे सहा किलोमीटर पाठलाग करून पकडले. तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.9) रात्री दहाच्या सुमारास घडली.

दोन विद्यार्थीनी रात्रीचे जेवण घेऊन अभिनवनगर रस्त्याने वसतिगृहाकडे जात होत्या. त्या रेंघे उद्यानाजवळ पोहचल्या असता पाठीमागून एक विकृत मनोवृत्तीचा तरुण दुचाकीवर आला. त्याने रस्त्यावर वर्दळ नसल्याचे पाहात एका तरुणीचे तोंड दाबत तिला जवळ ओढले. तसेच अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या तरुणीने आरडाअरडा केला असता परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे हा तरुण दुचाकीवरून पळून गेला. त्याने विजय अण्णासाहेब दिघे (वय 24, रा. कोल्हेवाडी) असे आपले नाव सांगितले. नागरिकांनी संबंधित तरुणींना धीर देत पोलिसांना पाचारण केले. पथक घटनेची माहिती घेत असताना तो तरुण काय घडले याची माहिती घेण्यासाठी तेथे आला. त्याला पाहताच तरुणींनी त्याच्याकडे इशारा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)