श्रीरामपूर, (प्रतिनिधी): – योगाभ्यासामुळे शरीराबरोबर मानसिक आरोग्य सुधारते. समाजामध्ये शरीर बलवान असलेले लोक बघितले जातात, परंतु एखादी समस्या, विपत्ती आल्यास त्यांचे मनोबल तुटते. योग केल्यामुळे आत्मबल वाढते. दररोज योगाभ्यास केल्यामुळे शारीरिक विकासाबरोबर, अध्यात्मिक विकास होतो.
युवकांनी दररोज योगाभ्यास केल्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. युवापिढी मानसिक,शारीरिकदृष्ट्या सुदृढ तयार होईल.आज देशात ३५ वर्ष वयोगटातील सुमारे ७० % तरुण युवा आपल्या देशात राहतात.
युवा पिढीने ध्येयवेडे होऊन युवाशक्तीच्या माध्यमातून महापुरुषांच्या स्वप्नातील भारत घडवू शकतो. राष्ट्रसेवा ही ईश्र्वरी सेवा मानून दिवसातील एक तास तुम्ही समाजाला द्या, असे कळकळीचे आवाहन पतंजलीचे युवा भारत केंद्रीय प्रभारी स्वामी आदित्यदेव महाराज यांनी केले.
श्रीरामपूर येथील पतंजली योग समितीमार्फत येथील गुजराथी मंगल कार्यालयात स्वामी रामदेव महाराज यांचे परमशिष्य, पतंजलीचे युवा भारत केंद्रीय प्रभारी स्वामी आदित्यदेव महाराज यांचे युवकांसाठी युवा संस्कार आरोग्य व इंटिग्रेटेड योग या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
स्वामी आदित्यदेव यांचा नावावर तीन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच ९.३० तासांमध्ये ५००० सूर्यनमस्कार , ५ तासांमध्ये २५०० सूर्यनमस्कार, एका तासामध्ये सगळ्यात जलद गतीने ५८५ सूर्यनमस्कार असे रेकॉर्ड आहे. याप्रसंगी महाराष्ट्र पश्चिम पतंजली किसान सेवा समिती राज्य प्रभारी उदय वाणी यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी श्रीरामपूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये मिस्टर इंडिया अवॉर्ड विजेते अॅड.सौरभ गदिया, पत्रकार मनोज आगे, योग क्षेत्रामध्ये अनिल कुलकर्णी, अशोक मेहेत्रे, जालिंदर कुर्हे, अॅड.सुशील पांडे , प्रसाद काते, दिनेश ठोकळ,
श्रीनिवास बिहाणी, राजेश चुडीवाल, राहुल बनकर, ्रराजेंद्र कारंकय, दिनेश पवार, ्रविपुल कोटक, ज्ञानेश्वर राजपूत, हेमा नवलखा, मयुरी पंखेवाला यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भाऊसाहेब वाबळे, डॉ.शंकरराव गागरे , दिनेश पवार चैतन्य थोरात धनंजय थोरात, निंबाळकर, वाघ, नितीन चित्ते आदींनी परिश्रम घेतले.