पाचगाव पर्वतीवर जोडप्यास लूटले

तरुणाच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली

पुणे – पाचगाव पर्वती टेकडीवर फिरण्यास गेलेल्या तरुण जोडप्यास मारहाण करण्याचा धाक दाखवत लूटण्यात आले. यातील तरुणाच्या डोळ्यात मिरचीपुड टाकल्यानंतर त्याला फुटलेल्या बाटलीच्या काचेने मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर तरूणीकडील मोबाईल, तरूणाचे पाकीट आणि बॅग जबरदस्तीने चोरण्यात आली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रेम जितेंद्र जमादार (21,रा.कमलाकर हाऊस, आनंद विहार, विठ्ठलवाडी, हिंगणे) हा त्याच्या मैत्रीणीबरोबर पाचगाव पर्वती टेकडीवर फिरायला गेला होते. तेथे दोघे मोबाईलमधून छायाचित्र काढत होते. यावेळी अचानक एक 18 ते 20 वर्षाचा मुलगा तेथे आला. त्याने प्रेमच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून फुटलेल्या बाटलीच्या काचेने मारहाण करण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या हल्लयामुळे प्रेम व त्याची मैत्रीण घाबरुन गेले. ही संधी साधत आरोपीने प्रेमचे पाकीट, बॅग आणी त्याच्या मैत्रीणीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.