योगी सरकारने 25 हजार होमगार्डसना दाखवला घरचा रस्ता

लखनऊ : उत्तरप्रदेश सरकार नेहमीच आपल्या वेगळ्या निर्णयामुळे चर्चेत राहिले आहे. मात्र यावेळी राज्य सरकारने घेतलेला निर्णय राज्यातील हजारो लोकांना बेरोजगार करणारा आहे. योगी सरकारने राज्यातील तब्बल 25 हजार होमगार्डना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात पोलिसांसोबतच होमगार्डसला देखील वेतन देण्यात येत होते त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत होता. दरम्यान, सरकारकडून आर्थिक कारण पुढे करत या सर्व होमगार्डसना सेवेतून कमी केले आहे.

राज्याच्या अतिरिक्‍त महासंचालकांच्या आदेशानंतर राज्यातील 25 हजार होमगार्डना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एवढेच नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करणाऱ्या होमगार्डसच्या संख्येतही 32 टक्‍के कपात करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिरिक्‍त महासंचालक पोलिस मुख्यालय बिपीन जोगदंड यांनी हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मागील 28 ऑगस्टला मुख्य सचिवांची बैठक झाली होती त्यावेळी होमगार्डसच्या कपातीविषयी निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत राज्यात 40 होमगार्डना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यापुढे आता होमगार्डसला 25 तासांऐवजी केवळ 15 तासांचीच सेवा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.