नेवासा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील हिंदु-मुस्लिम एैक्याचे प्रतिक असलेल्या न्यामत शहावली बाबांच्या यात्रोत्सवास बुधवार (दि.४) रोजी पासून प्रारंभ झालेला असून याञोत्सवा दरम्यान विविध धामिक कार्यक्रमांबरोबरच शुक्रवार व शनिवार दोन दिवस जंगी कुस्त्यांचा हगामा होणार आहेबुधवार (दि.४ डिसेंबर ते शनिवार दि.७) डिसेंबर या दरम्यान हा यात्रोत्सव सुरु राहणार आहे.चार दिवस चालणाऱ्या या उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही सालाबादप्रमाणे करण्यात आलेले आहे. यावर्षी या यात्रोत्सवानिमित्तने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यामुळे यात्रा कमिटीच्यावतीने योग्य नियोजन आखण्यात आलेले असून भाविक आणि व्यवसायिकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
शेवगांव – नेवासा राज्यमार्गावर दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती आणि गावाच्या पश्चिमेस न्यामत शहावली बाबांचा दर्गा आहे हे देवस्थान अतिशय जागृत असल्याच्या भाविकांच्या श्रध्देमुळे राज्यातून मोठ्या संख्येंने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात बुधवार (दि.४) रोजी गावातील भक्तगण सर्वधर्मिय युवक वाद्यवृंदात वरखेड येथून गंगेच्या पाण्याने कावडी घेऊन येत असतात रात्री फुलांनी सजवलेल्या कावडींची (संदल) गावातून सवाद्यात मिरवणुक काढण्यात येते व गंगेच्या पाण्याने रात्री बारा वाजता बाबांच्या तुर्बतास (समाधीस) गंगास्नान घालण्यात येते.
यावेळी गुळ – मलिदा नैवेध्य दिला जातो बाबांच्या समाधीवर पाणी टाकण्याचा व नैवद्य देण्याचा मान हिंदू देशमुख परिवाराकडे आहे उरुसाच्या मुख्य दिवशी गुरुवारी रात्री फुलांच्या चादरी छबिन्याची भव्य मिरवणूक काढली जाते यावेळी गावातीत अनेक भाविक फुलांच्या चादरी बाबांच्या चरणी अर्पण करून आपला नवस पूर्ती करत असतात न्यामत शहावली बाबांच्या बद्दल अख्यायीका सांगितली जाते की. कुकाणा गावच्या उत्तरेस शेरीचा मळा (रानमळा ) आहे तेथे सिंधी सुफी संत फिरत आले आणि त्यांच्या सोबत शिष्य शहावली बाबा होते अशी अख्यायिका आहे हा परिसर अतिशय रम्य असल्यामुळे त्यांनी येथेच मुक्काम केला या परिसरात उपदेश करत आपल्या जवळील घोड्यावरुन फिरत त्यांच्या येथील वास्तव्यामुळे गावावर कुठलेही संकट आजपर्यंत आलेले नाही. त्यांनी अनेक चमत्कार दाखविल्याचे जुण्या पिढीतील जाणकारांकडून सांगितले जातात त्यांमुळे बाबांच्या समाधीवर आज सर्वधर्मियांकडून माथा टेकविला जातो.
या यात्रोत्सव निमित्त बाबांच्या दर्गा परिसरात अकर्षक मंडप व दर्ग्यावर मोठी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे या चार दिवसाच्या काळात कोट्यावधींची आर्थिक उलाढाल याञोत्सवादरम्यान होत असते शुक्रवार व शनिवार दोन दिवस कुस्त्यांचा हगांमा भरतो यावेळी राज्यातून नांमवंत मल्ल हजेरी लावतात यशस्वी मल्लांना योग्य इनाम देवून गौरव करण्यात येतो या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होवू नये म्हणून नेवासा पोलीस निरिक्षक धंनजय जाधव व पोलीस कर्मचारी योग्य नियोजन आखून बंदोस्त करण्यासाठी सज्ज झालेले आहेत.