स्वतःला आवरा : बीडमध्ये टोळक्याची पोलीसांना मारहाण

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. याच गर्दीला रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागत आहेत. पोलिसांनी तर बळाचा वापर देखील केल्याचे दिसत आहे. मात्र रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या खाकी वर्दीला हात लावल्याची धक्कादायक घटना समोर आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावी ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी सिरसाळा पोलीस स्टेशनचे तीन पोलीस सीरसाळा शहरांमध्ये असलेल्या वडार कॉलनीमध्ये गस्त घालत होते. यावेळी घराच्या बाहेर का थांबलात? असे विचारल्यानंतर अशोक पवार याने पोलीसांना लाकूड फेकून मारले. यानंतर पोलीस आणि दहा ते बारा आरोपी यांच्यात मारामारी सुरू झाली. यावेळी एकूण तीन पोलीस घटनास्थळी होते. त्या ठिकाणी वाद इतका वाढला की पोलिसांना आरोपीच्या कुटुंबीयांनी विटा आणि हाताने मारायला सुरुवात केली. यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर घटमाळ हे जखमी झाले आहेत. जवळपास अर्धा तास शिरसाळा मधल्या वडार कॉलनीमध्ये हा गदारोळ चालू होता. पोलीस कॉन्स्टेबल किशोर घाटमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण बारा जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत.

या बारापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींवरती एकूण आठ गुन्हे सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाचे संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.