चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ‘या’ दोन खेळाडूंना मिळू शकते संधी; जाणून घ्या एका क्लीक वर…

नवी दिल्ली – भारत आणि इंग्लड संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लडला 10 विकेटसने पराभूत केले. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

तत्पूर्वी इंग्लड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 112 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात भारताने सर्वबाद 145 धावा केल्या. म्हणून भारतीय संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 33 धावांची आघाडी मिळवता आली.

तसेच दुसऱ्या डावात सुद्धा इंग्लडचा संघ 81 धावांवर गडगडला. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय संघाला विजयासाठी 49 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान भारतीय संघाने 7.4 षटकांत एक ही गडी न गमावता पूर्ण केले.

या सामन्यात सर्वाधिक 11 विकेट्स अक्सर पटेलने घेतल्या. त्याचबरोबर आर आश्विनने 7 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सामनावीर हा पुरस्कार अक्सर पटेलला देण्यात आला. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जरी दमदार विजय मिळवला असला तरी चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघत काही बदल केले जाऊ शकतात. कारण भारतीय संघात बरेच असे खेळाडू आहेत.

ज्यांना या मालिकेत प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अशा खेळाडूंना चौथ्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये  संधी दिली  जाऊ शकते. म्हणून आज आपण या लेखामधून कोणत्या दोन खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्याच्या प्लेईंग इलेव्हमध्ये संधी मिळेल  आणि कोणाला बाहेर बसावे लागू शकते हे जाणून घेऊया…

1. शुबमन गिलच्या जागी केएल राहुल
केएल राहुलला आतापर्यंत या कसोटी मालिकेत एकदा ही  प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी निळाली नाही. त्याचा भारतीय संघात कसोटी मालिकेसाठी समावेश करण्यात आला .मात्र अजून एकदाही त्याला खेळण्याची संधी दिली नाही. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सलामी फलंदाज शुबमन सलग दोन सामन्यात धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. अशात भारतीय संघात शुबमन गिलच्या जागी केएल राहुलला चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. केएल राहुल हा दमदार खेळाडू असून त्याला जर संधी मिळाली तर तो या संधीचे सोने करु शकतो.

2. वाशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादव
कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. परंतु त्या सामन्यात त्याच्याकडून जास्त गोलंदाजी करवून घेण्यात आली नव्हती. त्यानंतर तिसऱ्या कसोटी त्याला पुन्हा बाहेर बसवण्यात आले होते. मात्र त्याला चौथ्या कसोटी सामन्यात संधी दिली जाऊ शकते. कारण अहदाबाद येथील खेळपट्टीवर चेंडू टर्न घेत होता आणि वाशिंग्टन सुंदर कडून जास्त गोलंदाजी करवून घेण्यात आली नाही. त्यामुळे कुलदीप यादवला पुन्हा एकदा प्लेईंग इलेव्हन मध्ये स्थान मिळू  शकते.

– विकास मुढे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.